Wednesday, 29 March 2017

गोदावरीचे प्रदूषण

                     गोदावरी नदीत नजीकच्या मोठ्या नागरवस्तीतून येणाऱ्या सांडपाण्यापासून सर्वाधिक ८५% प्रदूषण होते. मान्सून सोडून इतर काळातील सिंचनोत्तर काळात नदीचे प्रवाह आधीच रोडावलेले व कमी वेगाचे असताना नदीची नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया मंदावते. शिवाय सांडपाणी सोडल्यामुळे पिण्याचे पाणी वरचे वर न घेता नदी पात्रातील विंधन विहिरींद्वारे अथवा धरणांतून घेतले जाते त्यामुळे पाणीनियोजन बिघडते व खर्चही वाढतो. उरलेले १५% प्रदूषण औद्योगिक कारणांमुळे होते. नाग पेंच कोलार नदीतून कन्हान मुख्यत्वे शह्ररी प्रदुषीत नद्या वैनगंगाला मिळतात सर्फेस वॉटर अम्ध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे बिओड्डी जास्त आहे. नाग पेंच कोलार नदीतून कन्हान मुख्यत्वे शह्ररी प्रदुषीत नद्या वैनगंगाला मिळतात सर्फेस वॉटर अम्ध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे बिओड्डी जास्त आहे.फ्लोराईड जास्त आहे डिझॉल्वड सॉलीड्स अधिक आहेत.
               गोदावरीचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदी प्रवाही राहणे आवश्यक आहे. गंगापूर धरणाच्या वरील भागात अधिक क्षमतेचे धरण बांधून गोदावरीला प्रवाही ठेवता येईल. या धरणासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. गोदावरी नदीच्या प्रदूषण निर्मूलनासाठी खुद्द पर्यावरणमंत्र्यांनी मांडलेल्या तोडग्यावर हसावे की रडावे, अशी पर्यावरणप्रेमींची अवस्था झाली आहे. गोदावरी नदीवर या पट्टय़ात नवीन धरण बांधण्यास प्रतिबंध आहे. यामुळे कितीही वाटले तरी धरण अस्तित्वात येणे अशक्य आहे. पर्यावरणमंत्र्यांनी गटारीचे पात्रात मिसळणारे पाणी, कँक्रिटीकरणामुळे नदीचा गुदमरलेला श्वास यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी नदी प्रवाही ठेवून प्रदूषण मुक्ततेचा पर्याय सुचविल्याने गोदावरीला प्रदूषणाच्या जोखडातून सोडविण्यासाठी धडपडणारे अवाक्  झाले आहेत.गुरुवारी कदम यांनी गोदावरीच्या स्थितीची रामकुंड, तपोवन व घारपुरे घाट परिसरात भेट देऊन पाहणी केली. तसेच महापालिकेच्या तपोवन येथील मैला व सांडपाणी व्यवस्थापन केंद्राची भेट देऊन माहिती घेतली. मंत्री महोदय या परिसरास भेट देणार असल्याचे समजल्यानंतर पालिकेची धावपळ उडाली. महोदय पाहणी करत असताना नदी स्वच्छतेचे काम इमानेइतबारे केले जात असल्याचे दर्शविले गेले. भाजी विक्रेत्यांना काही काळासाठी काठावर दुकान थाटण्यास मज्जाव करण्यात आला. या पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आ. प्रा. देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अन्बलगन, पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आदी उपस्थित होते. गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी र्सवकष उपाय करावेत, असे निर्देश कदम यांनी दिले. नदी प्रदूषणास प्लास्टिक पिशव्या मोठय़ा प्रमाणात कारणीभूत असल्याचे दिसून येते. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवरील र्निबधांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सूचित केले. दोषींवर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. याबाबतचा अहवाल दर दोन महिन्यांनंतर शासनास सादर करावा. गोदावरी नदी प्रवाहित राहिल्यास प्रदूषण नियंत्रणात राहील. गंगापूर धरणातून पाणी सोडण्यावर मर्यादा आहेत. यामुळे गोदावरी प्रवाही ठेवण्यासाठी गंगापूर धरणाच्या वरील भागात नवीन धरण बांधण्याची आवश्यकता त्यांनी मांडली. या धरणासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

डवले यांनी सिंहस्थ काळात गोदावरीतील पाणी स्वच्छ राहावे यासाठी झालेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यातील काही प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा चांगला परिणाम दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद व नगरपलिका यांच्या साहाय्याने प्लास्टिक बंदीसाठी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले. पालिका आयुक्त कृष्णा यांनी नदीत सांडपाणी व कचरा रोखण्यास प्राधान्य दिले जात असल्याकडे लक्ष वेधले. केंद्र शासनाच्या साहाय्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येत्या काही महिन्यांत कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचा लाभ नदी प्रदूषण रोखण्यासाठी होईल असे त्यांनी सांगितले.
प्रशासनाकडून दिशाभूल
गोदावरीवरील काँक्रिटीकरण आणि तत्सम बाबींवर प्रशासकीय यंत्रणांकडून पर्यावरणमंत्र्यांना दिशाभूल करणारी माहिती दिली गेली. गोदावरीच्या प्रदूषणावरील बैठकीला प्रदूषणाच्या विषयावर सातत्याने लढणाऱ्या आणि याचिका दाखल करणाऱ्यांना बोलावण्याचे औदार्य शासकीय यंत्रणांनी दाखविले नाही. प्रदूषण मुक्तीसाठी तात्पुरत्या व दीर्घकालीन उपायांची गरज आहे. नदी प्रवाहित करण्यासाठी गंगापूरला समांतर धरण बांधण्याची पर्यावरणमंत्र्यांनी केलेली घोषणा आश्चर्यकारक आहे. सांडपाणी पात्रात मिसळून नदी प्रदूषित होते. हे पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करणे, गोदापात्र स्वच्छ राखण्यासाठी विशिष्ट कालमर्यादेनंतर गंगापूर धरणातून पाणी सोडणे असे अनेक उपाय योजता येतील. गेल्या वर्षी दुष्काळामुळे धरणातून पाणी सोडता आले नाही. यंदा तशी स्थिती नसल्याची माहिती मांडून त्यावरील र्निबधही मागे घेता येतील. विविध उपायांवर काम करण्याऐवजी प्रशासकीय यंत्रणा निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत.

Tuesday, 28 March 2017

जागतिक तापमानवाढीचा परिणाम आणि उपाय......

जागतिक तापमानवाढीचा परिणाम आणि उपाय......      
               जागतिक तापमानवाढीचा परिणाम केवळ निसर्ग आणि मानव जातीवरच होत नसून तो आता पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यावरसुद्धा होत आहे. अंतर्गत हालचालींमुळे भूगर्भातील हालचाली वाढतात. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचे दोन्ही ध्रुव थरथरत आहे, ह् आता वास्तव आहे. याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, ते भविष्यातच कळणार आहे.तब्बल १८९९ पासून वैज्ञानिक पृथ्वीच्या ध्रुवाच्या थरथरण्याचा अभ्यास करीत आहेत. आजपर्यंत हे थरथरणे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचाच एक भाग असल्याचे वाटत होते.मात्र, नासाच्या ‘जेट प्रपोल्शन लेबॉरटरी’चे वैज्ञानिक सुरेंद्र अग्निहोत्री आणि एरिक एविन्स यांनी पृथ्वीच्या थरथरण्याचे कारण हे जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या ध्रुवीय बर्फ वितळण्यामुळे आणि त्यातून वजनाच्या अस्ताव्यस्त प्रमाणामुळे आहे, असे संशोधनाअंती सिद्ध केले आहे. उपग्रहाच्या माध्यमातून समुद्रातील पाण्याच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला.‘सायन्स अ‍ॅडव्हान्स’ या मासिकात काही दिवसांपूर्वीच त्यांनी हा निष्कर्ष प्रकाशित केला आहे. १८९९ पासून वैज्ञानिक पृथ्वीच्या अक्षाच्या थरथरण्याचा अभ्यास करीत आहेत. विसाव्या शतकात ते थोडेसे कॅनडाकडे झुकल्याचे आढळले, पण २००२ नंतर ते इंग्लंडकडे झुकल्याचे आढळले असून अक्षाची गती दरवर्षी ७ इंचाने पूर्वेकडे वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे धृवावरील बर्फ वितळले. विशेषत: २००३ पासून ग्रीनलंडवरील २७३ ट्रिलियन किलो, तर पश्चिम अंटाक्र्टिकावरील १२४ ट्रिलियन किलो बर्फ वितळले. मात्र, पूर्व अंटाक्र्टिकेवर ७४ ट्रिलियन किलो बर्फ दरवर्षी जास्त गोळा होत गेले, तसेच यामुळे सागरी प्रवाहात आणि पातळीतही बदल होत आहे. याच असमतोलामुळे पृथ्वीचे ध्रुव थरथरत आहेत.
अखेर सत्य उलगडले
सुमारे ५०-६० वर्षांपूर्वीच नासाने यावर अभ्यास सुरू केला होता. त्यावेळी जागतिक तापमानवाढ नव्हती, पण भूकंप आणि भूगर्भातील अंतर्गत हालचालींमुळे ध्रुव थरथरायचे. त्यावर त्यांनी अभ्यास केला होता. आता ते कारण नाही, पण तरीही ध्रुव का थरथरत आहेत, याचा उलगडा त्यांना होत नव्हता. त्यामुळे त्यांनी पुन्हा नव्याने अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर हे सत्य त्यांच्या अभ्यासातून समोर आले.
प्रयत्न करा अन्यथा परिणाम भोगा -प्रा. चोपणे
जागतिक तापमानवाढीमुळे अवर्षण, अतिवर्षां, अल-निनो, ला-निनो, तापमानवाढ, अशा मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे. आता या नव्या आश्चर्यकारक संशोधनामुळे भविष्यात काय होणार आहे, हे आजच सांगता येत नाही, पण कदाचित याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हायला पाहिजेत अन्यथा, आपल्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे खगोल व पर्यावरण अभ्यासक, तसेच ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

 उपाय -:

जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातला एक उपाय म्हणजे झाडं वाढवणे. सध्याचे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निमिर्ती कमी करणे आवश्यक आहे. जंगलांखालची भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. दुसरे म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण होताच तो पकडून सागरात सोडायची सोय करायला हवी किंवा याचे दुसऱ्या एखाद्या अविघटनशील संयुगात रूपांतर करावे लागेल. सागरात मोठ्या प्रमाणावर लोहसंयुगे ओतली तर वानस प्लवकांची (प्लँस्टॉन वनस्पती) वाढ होऊन त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल असं काही शास्त्रज्ञ म्हणतात.

सध्याच्या युगात कोणताही देश उर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. अभ्यासातील पहाणीनुसार विकसित देशांचा उ‍र्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.[१३] परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे. या देशांपुढील मोठा प्रश्ण आहे तो म्हणजे उर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरुन हरितवायूंचे प्रमाण कमी होईल. भारत , चीन या देशात दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लाक्षणीय रित्या वाढते आहे. वापर गुणिले लोकसंख्या यांचा विचार करता काही वर्षातच हे देश जगातील इतर देशांना हरितवायूंच्या उत्सर्जनात मागे टाकतील. जगातील इतर विकसनशील देशांच्या बाबतीत हेच लागू होते. म्हणून सध्या उर्जेचा वापर कमी करून व जागतिक तापमानवाढीवर मात करता येणे अवघड आहे. यावर मात करण्यासाठी तज्ञांचे असे मत आहे की अत्ता लगेच कार्बन डायॉक्साईड या मुख्य हरितवायूला वातावरणात सोडण्यापासून रोखणे. त्यामुळे शास्त्रज्ञ ज्वलनाच्या अश्या प्रक्रिया शोधत आहेत ज्यामुळे वातावरणात कार्बन डायॉक्साईड सोडला जाणार नाही व उर्जेचे उत्पादन खोळंबणार नाही. मध्यम स्वरुपातील उपायांमध्ये वाहनांसाठी व वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी नवीन प्रकरचे इंधन शोधून काढणे हे आहे. कायमस्वरुपी उपायांमध्ये तंत्रज्ञे विकसित करणे जेणेकरुन मानवाचे खनिज व निसर्गातील अमूल्य ठेव्यावर अवलंबून रहाणे कमी होईल असे उदेश्य आहे.


पानी फाउंडेशनमध्ये सहभागी व्हा...

पानी फाउंडेशनमध्ये सहभागी व्हा...
पानी फाउंडेशनचा हा विश्वास आहे की अपुऱ्या पाण्याच्या संकटावरचा उपाय हा पाणलोट व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण व पावसाच्या पाण्याच्या नियोजन यांत दडलं आहे. या करिता लोकांना प्रेरित करणं, प्रशिक्षित करणं आणि सक्षम करणं हे आमचं ध्येय आहे.
‘महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणं’ हे आमचं सर्वात पहिलं उद्दीष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक थोडक्यात समाजातील सर्व स्तरातील असंख्य लोक जेव्हा या चळवळीत उतरतील तेव्हाच हे शक्य होईल.
पाणलोट विकासाच्या कामात ‘श्रमदान’ करून त्याचप्रमाणे अजून कोणत्या पद्धतीने तुमचा सहभाग तुम्ही दाखवू इच्छित असाल तर कृपया आम्हाला सविस्तरपणे कळवा. सोबत तुमच्याबद्दल ‘आम्ही जाणणं आवश्यक आहे’ असं जे जे तुम्हाला वाटत असेल त्या संपूर्ण माहितीबद्द्लचा तपशील द्या.
सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ साठी निवडलेल्या ३० तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे:
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि धारुर
लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा आणि कळंब
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि खुलताबाद
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव
पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि इंदापूर
सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि उत्तर सोलापूर
अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळी, पातूर आणि अकोट
वाशिम जिल्ह्यातील कारंजा
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड
वर्धा जिल्ह्यातील आर्वी
अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धारणी
वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ असा आहे.
वेबसाईट: www.paanifoundation.in


सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ – दिनदर्शिका
३१ जानेवारी २०१७ – ३० तालुक्यांमधील गावांनी अर्ज देण्याची अंतिम तारीख
फेब्रुवारी आणि मार्च, २०१७ – ग्रामपंचायतीने निवडलेल्या पाच गावकऱ्यांचे चार दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबीर
८ एप्रिल ते २२ मे २०१७ – सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेचा कालावधी
२२ मे ते ३१ मे २०१७ – गावाच्या प्रगतीचा अहवालाचे सादरीकरण
१ जुन ते ३० जुन २०१७ – गावाच्या प्रगतीच्या अहवालाची वैधता तपासणी
१ जुलै ते १५ जुलै २०१७ – गावकऱ्यांकडून करण्यात आलेल्या कामांचे गुणात्मक विश्लेषण
१५ जुलै ते १० ऑगस्ट २०१७ – सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावांना तज्ञ परिक्षकांचे मंडळ भेटी देऊन निकाल तयार करण्याचा कालावधी


पानी फाउंडेशन

पानी फाउंडेशन विषयी                                                                                  
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्यासाठी आमिर खान आणि किरण राव यांनी २०१६ साली स्थापन केलेली पानी फाउंडेशन ही एक नानफा तत्वावर काम करणारी (not-for-profit) कंपनी आहे. पानी फाउंडेशनमध्ये सत्यमेव जयतेच्या कोअर टीमचा समावेश आहे. पानी फाउंडेशनचे सी... आहेत सत्यजित भटकळ (दिग्दर्शक: सत्यमेव जयते) आणि सी... आहेत रीना दत्ता.
पानी फाउंडेशनची गरज का आहे?
भारतात पाणी ही मोठी समस्या आहे आणि संधीही. पाण्याच्या दुर्भिक्षाने अनेक आयुष्यांची अक्षरशः वाताहत होते तर पाण्याच्या मुबलकतेनं प्रत्येक मानवी आयुष्यात अनेक सामाजिक आणि आर्थिक सुसंधी निर्माण होतात. ज्या गावात मुबलक पाणी असेल त्या गावातील लोकांची शैक्षणिक पातळी उच्च असते. आणि ती लोक पाण्याची टंचाई असलेल्या गावांच्या तुलनेत अधिक आरोग्यसंपन्न, दीर्घायू आणि भक्कम आर्थिक स्थितीत असतात.
भारतात पाणी संकट आहे का?
जगातील अनेक राष्ट्रांच्या तुलनेत भारत हे पुरेसं पाणी असणारं राष्ट्र आहे. इथे कधी अति मुबलकता नव्हती किंवा दुर्भिक्षही नव्हतं. गरजेपुरतं पाणी होतं पण आज लोकांना प्यायला ही पाणी नाही, शेतकरी दुष्काळाला आणि उपासमारीला तोंड देत आहेत आणि कित्येक कारखाने बंद होत आहेत किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांची वाढ होवू शकत नाही आहे.
हे संकट का आहे?
हे संकट मुख्यत्वे मानवनिर्मित असून याची चार मुख्य कारणे आहेत.
. प्रदूषण: आपण आपल्या नद्या आणि तलाव प्रदूषित केले आहेत.
. अति-शोषण: भूगर्भातल्या पाण्याचे पुनर्भरण करता आपण अतिशय बेपर्वाईने भूगर्भातल्या पाण्याचा उपसा केलेला आहे, ज्यामुळे भूगर्भातील पाण्याचा स्तर आपत्तीजनक स्थितीपर्यंत पोहोचलेला आहे.
. पाण्याचं अविवेकी व्यवस्थापन: जसे की दुष्काळ प्रवण भागात भयंकर जास्त पाणी लागणाऱ्या उसाचं पिकं घेणं.
. हवामान बदल: पाऊस पडणारं क्षेत्रफळ आणि कालावधी दोन्ही कमी होत चाललेत. पावसाचे दिवस कमी होत आहेत. पाऊस काही विशिष्ट भागांपुरताच मर्यादित राहिलाय आणि एक मोठ्ठा जनसमुदाय दुष्काळग्रस्त बनलाय.
यावर उपाय आहे का?
मुख्य उपाय आहे स्थानिक पातळीवर पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवणं आणि जिरवणं. त्याद्वारे भूगर्भपातळीत वाढ करणं आणि वाहून गेल्यामुळे तसंच बाष्पीभवनामुळे होणारं पाण्याचं नुकसान टाळणं. एका शब्दात सांगायचं तर हा उपाय आहेपाणलोट व्यवस्थापन’!
अगदी स्वस्त आणि खूपच मोठ्या प्रमाणावर यशस्वी होणारा असा हा उपाय आहे पण देशाच्या फक्त काही भागातील गावांनीच हा उपाय केला आहे. हा उपाय प्रचंड मोठ्या संख्येने जास्तीत जास्त गावांनी अवलंबिला पाहिजे, हे आपल्यासमोरचं आजचं आव्हान आहे. भारतातील प्रत्येक गावाने, नगराने, शहराने पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं गरजेचं आहे. त्याशिवाय पाण्याचं प्रदूषण थांबवणं आणि पाण्याचा अनिर्बंध वापर रोखणे हे ही अत्यंत गरजेचं आहे.
पानी फाउंडेशन काय करणार आहे?
सुरुवातीला पानी फाउंडेशन फक्त महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्येवर काम करणार आहे.
महाराष्ट्र सरकारने गावपातळीवर पाणलोट व्यवस्थापन करण्यासाठीजलयुक्त शिवारहा महत्वाकांक्षी उपक्रम सुरु केला आहे. यांतर्गत अनेक स्वयंसेवी संस्था आणि कार्पोरेट कंपन्यानी अनेक गावं दत्तक घेतली आहेत. आणि गावकऱ्यांच्याच मदतीने त्या गावांमध्ये स्थानिक पातळीवर जलसंवर्धनाच काम ते करत आहेत. ही सर्व काम तर महत्वाची आहेतच पण याचबरोबर आम्ही पाण्याच्या या आव्हानाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून भिडण्याचा प्रयत्न करतोय.
आमचा हा विश्वास आहे की पाण्याची समस्या सोडवण्याची सर्वात मोठी शक्ती आणि क्षमता लोकांमध्येच आहे. एकदा का लोकांना ही गोष्ट मनापासून पटली आणि ते प्रेरित झाले मग त्यांच्या त्यांच्या भागात पाणी अडवायला आणि साठवायला जे जे उपाय आवश्यक असतील, लोक ते ते उपाय शोधतील आणि करतीलही. अपुऱ्या पाण्याच संकट दूर करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना जो मोठ्या प्रमाणावर वेग द्यावा लागणार आहे त्यासाठी यापेक्षा वास्तवदर्शी उपाययोजना कदाचित दुसरी असू शकत नाही.
पानी फाउंडेशन तीन प्रमुख आघाड्यांवर ठोस काम करणार आहे:
. प्रेरणा: लोकांना याची खात्री पटायला हवी की स्थानिक पातळीवर पावसाचं पाणी वाचवणं हाच जलसुरक्षेचा खात्रीशीर मार्ग आहे. शेतकरी, उद्योगपती, लहान-मोठा प्रत्येक नागरिक या चळवळीचा एक भाग झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात ही भवना रुजली पाहिजे की या कामात माझी एक महत्वाची भूमिका असणार आहे आणि ती मी सहज आणि हसत खेळत पार पाडू शकणार आहे.
पानी फाउंडेशन जनसंपर्काच्या प्रत्येक माध्यमाचा डिजिटल मिडीयाचा वापर करत लोकांचं मनोरंजनातून शिक्षण करेल त्याद्वारे त्यांना प्रेरित करेल आणि या चळवळीशी त्याचं एक भावनिक नातं प्रस्थापित करेल.
. प्रशिक्षण: पानी फाउंडेशन प्रत्येक गावातील पाच लोकांना पाणलोट व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्याचं काम करील. या संपूर्ण प्रक्रियेत साधारण अडीच लाख लोक हे प्रशिक्षण पूर्ण करतील. या प्रशिक्षणाचे दोन प्रमुख घटक असतील:
) पाणलोट विकास आणि जलसंवर्धन योजनांच तांत्रिक प्रशिक्षण
) आपापल्या गावातील पाणलोट योजनांच्या यशस्वी अंमलबजावणी साठी गावातील सर्व लोकांची एकजूट घडवून आणणारे सक्षम नेतृत्व निर्माण करणे
. संसाधनांसाठीचं व्यासपीठ: पानी फाउंडेशन एक डिजिटल व्यासपीठ निर्माण करेल ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पुढील गोष्टी सहज शक्य होतील:
माहितीगार आणि तज्ञ लोकांकडून तांत्रिक माहिती मिळवणे.
लोक समुहाकडून निधींच संकलन करणे.
सरकारी मदत मिळवणे सरकारसोबत जोडलं जाणे.
मार्गदर्शकांच्या ज्ञानाचा फायदा घेणे.
स्वयंसेवकांसोबत जोडल जाणे.




Sunday, 26 March 2017

मनाची निर्मळता म्हणजे तरी काय?

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती। वघ्रहि न खाती सर्प तया ।।1।।
विष अमृत आघात ते हित।अकर्तव्य नीत होय त्यासी ।।2।।
दु:ख ते देईल सर्व सुख फळ।होतील शीतळ अग्निज्वाळा।3।।
आवडेल जीवा जीवाचिये परी।सकळां अंतरी एक भाव।।4।।
तुका म्हणे कृपा केली नारायणें।जाणिजे ते येणे अनुभवे।।5।।

मनाची निर्मळता म्हणजे तरी काय........
            तुकाराम महाराजांनी या अभंगात अंत:करणात असलेली सद्भावना आणि सर्वाप्रति सदिच्छा असेल तर मिळणार्‍या मन:शांतीचे महत्त्व सांगितले आहे. मन द्वेषरहित व शुद्ध असेल तर शत्रूही मित्र होतात. एवढेच नव्हे तर वाघ, साप इ. भयप्रद मानले जाणारे प्राणीसुद्धा स्पर्श करीत नाहीत. अंत:करणातील निर्मळतेमुळे विषारी भावसुद्धा अमृमय होतात. मनाची निर्मळता म्हणजे तरी काय? मानवी मनाच्या विविध अवस्था याच भावनांची उपपत्ती करतात. तुकारामांनी या अभंगात एका सुसूत्र, तार्किक व मनोविश्लेषणात्मक अशा विचारांची सुरेख मांडणी केली आहे. दुजाभाव, द्वेष, मत्सर, अमंगाल्य विचारांपासून मनाला दूर ठेवणे. निर्मळ मन म्हणजे खळखळणारा झरा, मंद वेगाने वाहणारा वारा, चंद्राचा शीतल प्रकाश उगवत र्सूकिरणांचा उबदारपणा, अशा तर्‍हेची अनुभूती होय. म्हणजे मन शुद्ध, पवित्र द्वेषविरहित ठेवले की त्याचे उपद्रवमूल्य कमी तर होतेच ते इतरांसाठी, पण स्वत:च्याही मनातील अस्वस्थता, अकारण चिंता भाव दूर होतात.
                    जीवनातील आघातांचे दु:ख जाणवेनासे होते ते मनाच्या स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे, हेच तुकोबांना सुचवाचे होते. यानिमित्ताने आपले माजी राष्ट्रपती व विश्वविख्यात शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वृत्ती व कार्यप्रवणता यातून मनातील इच्छा मूर्त स्वरूपामध्ये कशा आणता येऊ शकतात, याचे एक महत्त्वाचे सूत्र त्यांच्या वर्तनात आढळते. हृदयापासून, मनापासून एखादी इच्छा जर निर्माण झाली आणि ती जर तीव्र आणि पवित्र असेल आणि जर तिचा मनाला ध्यास लागला असेल तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. ज्यावेळेस आपण निद्रिस्त अवस्थेत असतो, त्यावेळेस ती आसमांतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये परतते. अशाप्रकारे जर ती वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवते. 

सैराट व्यसनाधीनता.......


सैराट व्यसनाधीनता......

हल्ली अनेकदा प्रवास करताना आपल्याला एक दृश्य हमखास दिसू लागलेलं आहे.. त्या चारचौघी आणि ते चारचौघे किंवा त्यांच्यात ती एकटीच. त्यांच्या दुचाकी गाडय़ांवर एका आडोशाला एकत्र बसलेले असतात आणि एक सिगरेट सगळ्यांची तल्लफ भागवत साऱ्यांच्या हातातून वावरत असते.. हे दृश्य दिसणं काही वर्षांपूर्वी खरंच इतकं सामान्य होतं का? व्यसनाबाबत स्त्रियांचं हे निर्भीड वर्तन इतक्या मोठय़ा प्रमाणात आधी का बरं नसावं? इतकं काय बदललं आहे आपल्या समाजात? नुसती सिगरेट, हुक्का किंवा दारू या व्यसनांमध्येच नाही तर भांगसारख्या व्यसनांनादेखील मुली सहज बळी पडताना दिसतायेत. गेल्या ५-६ वर्षांत मुलींमध्ये भांग व्यसन दहा पटीनं वाढलं आहे आणि सिगारेटचं व्यसन दहा वर्षांत १५ टक्क्यांनी वाढलं आहे.या बिघडलेल्या समतोलासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. या लेखात आपण फक्त शहरी वर्गातील बदलतं चित्र पाहतो आहोत. ग्रामीण भागातील व्यसनग्रस्त स्त्रियांची संख्या आणि कारणं खूप वेगळी आहेत. त्याचा सविस्तर विचार करावा लागेल. पूर्वीच्या काही रूढी-परंपरांमुळे म्हणा, कमी असलेल्या सामाजिक दर्जामुळे किंवा असमानतेमुळे म्हणा मुलींच्या शिक्षणाची, व्यक्तिमत्त्व विकासाची प्रचंड आबाळ झाली. आता तसं नाही, मुलींना पूर्ण पाठिंबा देऊन त्यांचे आई-वडील आणि परिवार त्यांना त्यांच्या आवडीचे, निवडीचे प्रगतिशील आयुष्य जगण्याची मुभा देतायेत.. पण या प्रगतिशील स्वातंत्र्याचा अनेकदा दुरुपयोग होतानाही आढळून येतोय.. आम्ही मुलांसारख्याच तर आहोत, ते धूम्रपान करतात तर आम्ही का नको, या भूमिकेतून असेल किंवा अनेकदा मुली शिक्षणासाठी, नोकरीसाठी घरातून बाहेर पडून स्वतंत्र राहतात आणि मग घरच्यांच्या धाकाचे बंधन जणू नाहीसं होत जातं, लक्ष ठेवणारं, ओरडणारं कोणी नसतं अशा वेळी मनमौजी जगण्याकडे कल वाढत जातो. पब्सना, विविध अमान्य पार्टीजना लावली जाणारी हजेरी, विविध ड्रग्सची होणारी पहिली तोंडओळख हे या वयाचे पुढील मनमौजी कारभार ठरतात. संस्कारांची शिदोरी बांधून घेऊन घरातून स्वत:चं सामथ्र्य आणि अस्तित्व सिद्ध करायला निघालेल्या या मुलींना स्वातंत्र्याच्या आड व्यसनांचेही महामार्ग सहज सापडतात आणि एकदा का त्या विळख्यात अडकल्या की नंतर सर्व बंधनं झुगारून या व्यसनांना आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवतात. गंमत म्हणून केलेली सुरुवात नंतर जिवाशीही बेतू शकते. अनेकींना त्याचा फटका बसलेला आहे.
       ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानतर्फे चालविण्यात येणाऱ्या तंबाखू मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत व्यसनमुक्तीसंदर्भात काम करत असताना अशा अनेक तरुणी, स्त्रिया भेटल्या. त्यांची व्यसन प्रकरणे हाताळल्यानंतर कळलं, कुठे तरी त्या मुलींना मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर, आईवडिलाचं झालेलं दुर्लक्ष, कुटुंबामधला संपत चाललेला संवाद, व्यसनी मित्रांची/ मैत्रिणींची संगत, कोवळ्या वयात हातात पडलेला जास्तीचा पैसा, व्यसनांबद्दलची लवकर जागृत होणारी उत्कंठा, कमी होत चाललेले सामाजिक भय, कमी पडत असलेली नियमांची शासकीय अंमलबजावणी, पोलिसी भय यांसारखी अनेक कारणे मुलींच्या या ‘सैराट’ व्यसनाधीनतेला जबाबदार आहेत.

तंबाखू, सिगरेट, खैनी, पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ हे तंबाखूच्या पानांमधून पूर्ण किंवा अंशत: अर्क घेऊन बनविले जातात. आपली देशी तंबाखू ही आत्ताची आधुनिक पिढी सिगरेट आणि हुक्क्यामधून जास्त प्रमाणात सहजपणे स्वीकारताना दिसते. ते एक मॉडर्न युगाचे स्टेटमेंट वाटते या तरुणाईला! एकदा सिगरेट ओढली की ती पुन्हा ओढली जातेच किंवा ओढावीशी वाटतेच.. ही ओढ म्हणजे त्या तंबाखूजन्य पदार्थातील निकोटिन नामक द्रवाची किमया. हे निकोटिन आपल्या शरीरात अड्रेनलिन निर्माण करते जे की आपल्या शरीरात साधारणत: एखाद्या अतिशय आल्हाददायी क्रियेनंतर निर्माण होणारे रसायन आहे. अड्रेनलिन निर्माण झाल्यावर त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढतात आणि रक्तदाबही उच्चांकी वाढतो. या दोन्ही शारीरिक बदलांमुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला आधीपेक्षा अधिक दक्ष/ जागरूक/तल्लख किंवा अलर्ट असल्याची भावना निर्माण होते. शरीरातील निकोटिन काही सेकंदातच मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचते. या निकोटिनच्या प्रभावात आपला मेंदू डोपामिन नामक दुसरे रसायन निर्माण करतो आणि ते रसायन मेंदूच्या आनंद केंद्रांना उत्तेजित करते. या शारीरिक बदलांमुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्याला त्याची तल्लफ नकळतपणे लागून जाते. पण या निकोटिनचा परिणाम दीर्घकालीन नसल्यामुळे या तलफीमुळेच त्याचे सेवन करण्याची पुन:पुन्हा इच्छा होत राहते आणि सहज म्हणून केलेली सुरुवात नंतर व्यसनाकडे वेगाने प्रवास करू शकते.

तंबाखू जवळजवळ शरीरातील प्रत्येक अवयवावर घातक हल्ला करते. तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग विशेषत: फुप्फुसाचा कर्करोग, फुप्फुसाचे रोग(COPD, Emphysema), नपुंसकत्व, हृदयविकार, उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांसंबंधी रोग (peripheral vascular disease) ज्यामुळे मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव, हृदयविकाराचा झटका, अर्धागवायूचा झटका, स्वरयंत्राचा रोग, दृष्टी कमी होणे, दात-हिरडय़ांचे रोग, अकाली त्वचेचे सुरकुतणे अशा अनेक व्याधी निर्माण होतात. याशिवाय स्त्रियांमध्ये कमी हाडांची घनता, संधिवात, मोतीबिंदू, हिरडय़ांचे आजार, कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर जखम भरून येण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत विलंब, उदासीनता, अधिक अनियमित किंवा वेदनादायक मासिक पाळी, लवकर मासिक पाळी बंद होणे, गर्भधारणा होण्यासाठी त्रास, ‘एसआयडीएस’चा वाढलेला धोका , श्वास घ्यायला त्रास होणे, अकाली वंध्यत्व, अकाली गर्भपात, जन्माला आलेल्या अर्भकाच्या मेंदूवर परिणाम, अर्भकाचे जन्मत: कमी वजन असणे यासारखे घोर दुष्परिणाम आढळतात.

धूम्रपान प्रत्यक्षात अकाली मृत्यू आणि लैंगिक समस्या निर्माण करतं, मात्र तरुणाईमध्ये ते स्टेटस सिम्बॉल मानलं जात असल्याने त्याला उगाचच प्रतिष्ठेचं, संपत्तीचं वलय लाभलेलं आहे. तंबाखूचे दुष्परिणाम इतके आत्मघातकी असूनसुद्धा तो जगात आजही अजिबात गंभीरपणे घेतला जात नाही. अर्थात देशात अनेक तंबाखूविरोधी कायदे आहेत, सार्वजनिक धूम्रपान निषिद्ध आहे, त्याच्या सेवनासंदर्भात जाहिरातदेखील दाखवणं व्यज्र्य आहे, पण तरीही आपल्या राज्याचीच नाही तर संपूर्ण देशाची खूप मोठी कमावती लोकसंख्या या व्यसनाच्या विळख्यात अडकलेली आहे आणि आजारग्रस्त आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१२ च्या सर्वेक्षणानुसार जगातील एक अब्ज धूम्रपान करणाऱ्या लोकांमधल्या सुमारे २० कोटी स्त्रिया आहेत. केवळ धूम्रपानाने दर वर्षी ५० लाख लोक मृत्युमुखी पडतात. तंबाखू सेवनामुळे होणारे आजार जगभरात होणाऱ्या अकाली मृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. मात्र या आजाराला बचावयोग्य रोगांमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले असल्याने वेळेत त्यावर आळा घालण्यात यश मिळाल्यास व्यसनाधीनतेच्या वाढणाऱ्या टक्केवारीला सामोरे जाणे आणि व्यसनी लोकसंख्येला यातून बाहेर काढणे अधिक सोपे होऊ शकेल, असे अनेक सामाजिक संघटनांना वाटते.

पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या कारणांसाठी व्यसन करतात आणि वेगवेगळ्या कारणांसाठी व्यसन सोडतात हे अभ्यासाने सिद्ध झाले आहे. पुरुष अनेक वेळा धूम्रपान एक सवय किंवा बाह्य़रूपाची सकारात्मक संवेदना दर्शवण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी धूम्रपान करतात. स्त्रिया त्यातही बहुतांश तरुणी नकारात्मक भावनेविरुद्ध प्रतिबंधात्मक म्हणून (बफर) धूम्रपान करतात. एक मात्र दिसून आलं आहे की ५६ टक्के पुरुष हे आपल्या मित्रांसोबत असताना किंवा प्रवासात सिगारेट पितात त्या तुलनेत ४८ टक्केच स्त्रिया घराबाहेर सिगारेट पितात. मुली मुलांपेक्षा वजन वाढण्याची भीती जास्त बाळगून असतात म्हणून अनेकदा या व्यसनाचा आरंभ वजन नियंत्रणासाठी होण्याची शक्यता अधिक असते. सिगरेट सोडल्यास वजन पुन्हा वाढेल अशी भीती त्यांना वाटते. पूर्वी स्त्रिया बहुतांशी एकटय़ा असताना सिगरेट प्यायच्या, पण हे चित्र आता बदलते आहे. मुली सर्रास उघडपणे, रस्त्यावर, ऑफिस कॅम्पसमध्ये, मित्रांसह कट्टय़ावर सिगरेट पिताना दिसू लागल्या आहेत, शिवाय खूप उशिरापर्यंत काम केल्यानंतर रिलॅक्स वाटावं यासाठीही अनेकदा मुली सिगरेट ओढताना दिसतात. त्याचं प्रमाण इतकं वाढतं आहे, की सामाजिक आणि कायद्याचं भय त्यांच्यासाठी संपल्यात जमा आहे. निदान शहरात तरी.

स्त्रियांच्या या व्यसनाधीनतेचं आणखी एक कारण म्हणजे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची सिगरेट सहज सुटत नाही. एखाद्या पुरुषाने ठरवलं आणि त्याला योग्य आधार, उपचार मिळाले तर तो सिगरेट कायमची सोडू शकतो, कारण पुरुषांच्या शरीरावर निकोटिनच्या अभावाचा वेगळा परिणाम होतो. स्त्रियांच्या बाबतीत मात्र हा प्रतिसाद वेगळा असतो. एखाद्या स्त्रीचं व्यसन सुटलेलं असलं तरी भावनिक नैराश्य आणि संप्रेरक मात्रांचा बिघडलेला समतोल तिला पुन्हा त्याच वेगाने व्यसनाकडे नेऊ शकतो. अर्थात प्रयत्नातील सातत्याने व्यसनावर मात करता येऊ शकते.

धूम्रपान करणं किंवा तंबाखू सेवन करणं असो जोपर्यंत ते मर्यादित आहे (तेही असू नयेच) तोपर्यंत ते सोडणं शक्य तरी होतं, मात्र एकदा का त्याचं व्यसन लागलं तर सहज सुटत नाही. तसा प्रयत्न केल्यास हात थरथरणे, भरपूर घाम येणे, चिडचिड, हृदयाचे ठोके वाढणे, तल्लफ येत राहणे, तणावाच्या काळात तीव्रपणे व्यसन करावंसं वाटणं इत्यादी अनुभव जास्त येतात त्यामुळे उलट व्यसन न सोडण्याची इच्छा जास्त दीर्घकाळ टिकते. त्यामुळे व्यसन लागू शकतंय हे कळताच ते सोडणं हे सर्वात चांगलं, पण तसं नाही झालं तर मात्र जवळच्यांनी, हितचिंतकांनी त्या व्यक्तीला ते व्यसन सोडण्यास मदत करायला हवी. अनेक संस्था, समुपदेशकही हे काम करतात. जमल्यास त्यांचीही मदत घ्यावी. त्यासाठी आधी तंबाखू आणि निकोटिन व्यसनावर उपाय म्हणून तंबाखू आणि दुष्परिणामांची संपूर्ण माहिती करून द्यायला हवी. कुटुंबीयांनीच नव्हे तर सामाजानेही त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यांच्यातलं मानसिक बळ वाढण्यासाठी मित्र-आप्तेष्टांकडून सहकार्य आणि सातत्याने प्रेरणा मिळायला हवी. निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी (ठफळ) ज्यामध्ये निकोटिनची तल्लफ ही त्याचे अर्क असलेली हाताला पट्टी लावून, स्प्रे किंवा इन्हेलर देऊन त्याची शरीरातली मात्रा वाढवून तल्लफ हळूहळू कमी केली जाते. ती तल्लफ व्यसन न करताच भागवली जाते आणि काही काळातच यावर ताबादेखील मिळवता येतो. या थेरपीज हळूहळू शरीराला तंबाखूचा वियोग सहन करण्याचं शिकवून व्यसन सोडवण्यास मदत करते, त्याची मदत घ्यावी. मानसिक आरोग्य सल्ला केंद्राचा आधार घ्यावा त्यामुळे वागणुकीतले बदल, चिडचिड, व्यसन-नियंत्रणाचे सातत्य राखण्यासाठी प्रेरक साथ मिळते.

बहुतांश घटनांमध्ये, अनेक उपचार पद्धती आवश्यक असतात आणि त्यांचे सुयोग्य संयोजन केल्यास व्यसन सोडवणं सोप्पं होतं. शिवाय मनाचा निग्रह खूप मोलाचं काम करतं. स्त्रियांना व्यसन सोडण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताण कमी करणे, त्यासाठी मदत मिळणं आवश्यक असतं. मार्गदर्शनपर ध्यानधारणा, शास्त्रीय ध्यानधारणा, एकाग्रता वर्ग, प्राणायाम, योग यांच्याबरोबर किंबहुना सर्वात महत्त्वाचं म्हणजे कौटुंबिक आधार, मदत. जेव्हा जेव्हा या व्यक्तींना ती गोष्ट घेण्याची तल्लफ येते तेव्हा तेव्हा घरच्या कुणी किंवा मित्रमैत्रिणींनी जर त्यांना ते करण्यापासून परावृत्त केलं, त्यांना समजून घेत मदत केली तर ही माणसं नक्कीच या व्यसनातून बाहेर पडू शकतील.

२००९-२०१० च्या जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार, भारतामध्ये सरासरी ३४.६ टक्के प्रौढ लोक तंबाखूचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवन करतात ज्यातील २५.९ टक्के लोक तंबाखूचे चघळून सेवन करतात, ९.२ टक्के लोक बिडीच्या स्वरूपात तर ५.७ टक्के लोक सिगरेटच्या स्वरूपात करतात. यातील ६० टक्के लोक असे आहेत की ज्यांना सकाळी उठल्यानंतर अध्र्या तासात तंबाखूचे सेवन करावेच लागते. प्रत्येक १० मधील ५ लोकांना अप्रत्यक्ष धूम्रपानाचा त्रास होतो आणि त्यातील ५० टक्के लोक हा त्रास त्यांच्या घरीच अनुभवतात तर २५ टक्के लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वर्तुळात हा त्रास होत असल्याचे सांगतात.

तंबाखूचे सेवन करणाऱ्या प्रत्येक ५ मधील ३ लोकांना म्हणजे जवळजवळ ६१.१ टक्के लोकांना तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या पाकिटांवरील आरोग्य धोक्याची सूचना निदर्शनास आली आणि त्यामधील प्रत्येक ३ मधील १ व्यक्तीने म्हणजेच जवळजवळ ३१.५ टक्के लोकांनी त्या तंबाखूचे सेवन केवळ ही चित्रमय आरोग्य इशारा पाहिल्यामुळे त्यातील गांभीर्य लक्षात येऊन ते सोडण्याची तयारी दाखवली. साधारणपणे ग्रामीण भागातील ३२.५ टक्के लोक तर शहरी भागातील २१.१ टक्के लोक धूम्रपान आणि तंबाखू सेवन करतात. ं हे व्यसन सोडवण्यात ग्रामीण भागात ५ टक्के यश आलं आहे तर शहरी भागात ६ टक्के यश आलं आहे.

इच्छा आहे तेथे मार्ग आहेच. तेव्हा व्यसनापासून मुक्त होणं गरजेचं आहे, पण त्याआधी त्या व्यसनाची पहिली पायरी म्हणजे सिगरेट ओढणं वा पहिला तंबाखूजन्य पदार्थ खाणं, हीच जर नष्ट केली तर कितीतरी जण निरोगी तर रहातीलच पण कित्येकांचे प्राण वाचतील. तेव्हा येत्या ३१ मार्चच्या तंबाखूवज्र्य दिनी व्यसन न करण्याची शपथ घ्या. स्वत: बरोबरच कुटुंबातील कुणी हे व्यसन करत असतील तर त्यांनाही त्यापासून रोखा. आपण निरोगी तर आपला समाजही निरोगी. समाजाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण हे करायलाच हवं.
तंबाखू सेवनाचे प्रकार

सिगरेट : सहजपणे घेतला जाणारा आणि सर्वात हानीकारक

विडी : भारतात या स्वरूपात सहजपणे सेवन

सिगार : उच्चभ्रू वर्गाची निवड

हुक्का : सध्याच्या तरुणाईच्या हातचे नवे स्ट्रेस-किलर (हबल बबल) शीशा

तंबाखू चघळणे : ग्रामीण भागातील सर्वमान्य ‘औषधी’ व्यसन

क्रेतेक्स (लवंग सिगरेट) : किशोरवयीन मुलांची पहिली सिगरेट

तपकीर : ओलसर आणि कोरडी नाकाने हुंगण्याची

मिसरी : भाजलेली तंबाखू पूड, अनेकदा दात घासण्यासाठी वापरली जाते

ई-सिगरेट : आत्ताचे इलेक्ट्रॉनिक आगंतुक

अध्यात्म आणि विज्ञान परस्परांना पूरकच

         एकीकडे बुध्दीच्या बळावर वैज्ञानिक क्षेत्रात मानवाने साधलेल्या अचाट प्रगतीचे चित्र दिसत असतानाच, दुसरीकडे भारतीय समाजात मात्र अध्यात्माच्या नावाखाली दिवसेंदिवस वाढत चाललेली अंधश्रध्दा, बुवाबाजी असे चित्र दिसते. भारतीय समाजाची मानसिकता दर्शवणाऱ्या या परस्पर विरोधी चित्रांमुळे 'अध्यात्म' आणि 'विज्ञान' यांच्यातील परस्पर संबंधाविषयी समाजाने पुन्हा नव्याने जाणून घेण्याची गरज आज निर्माण झाल्याचे जाणवते. सर्वात प्रथम 'अध्यात्म' आणि 'विज्ञान' यांच्या व्याख्या समजून घेऊन, त्यांचा उद्देश काय आहे ते लक्षात घेऊ. 'अध्यात्म' ( अधि + आत्मन् ) म्हणजे स्वतःसंबंधीचा अभ्यास होय. यात देहापासून आत्म्यापर्यंतचा ('मी' पर्यंतचा) अभ्यास अपेक्षित आहे. 'विज्ञान' याचा अर्थ विशिष्ट ज्ञान किंवा विशेष ज्ञान होय. अनेक वेळा अनुभव घेऊन हे ज्ञान सिध्द होतं. आजचं सायन्स विश्वामागची जी चालक शक्ती शोधण्याचं काम करत आहे, त्या शक्तीचा शोध भारतात फार प्राचीन काळीच अध्यात्माने 'ईश्वर' (अधिकार गाजवणाऱ्यातील श्रेष्ठ) या नावाने घेतला होता. आध्यात्मिक भाषेत सगळया विश्वात एकच 'आत्मा' भरून राहिलाय हे जाणणं म्हणजे 'ब्रह्मज्ञान' होय असं मानतात.                                     न्यूटनच्या काळात विज्ञान विश्वात विद्युत, चुंबकीय, यांत्रिक अशा अनेक शक्ती आहेत असं मानत असे. अधिक संशोधनानंतर या विविध शक्ती ग्रव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटीक फोर्स, ब्रीक न्युक्लीअर फोर्स व स्ट्राँग न्युक्लिअर फोर्स या चार मूलभूत शक्तींची उपांगे आहेत असं सिध्द झालं. हे मत १९८० पर्यंत प्रचलित होतं. अधिक नवीन संशोधनानुसार ह्या चारही मूलभूत शक्ती एकाच शक्तीची उपांगे आहेत हे आज सिध्द झालेलं आहे. विज्ञानाने ह्या शक्तीला अजून नाव दिलेले नाही. प्राचीन भारतात वेदांपासून या शक्तीलाच ईश्वर किंवा परब्रह्म म्हटलेले आहे. यावरून अध्यात्म आणि विज्ञानामध्ये परस्पर विरोध नसून परस्पर पूरकता असल्याचे दिसून येते. प्राचीन भारतीय ज्ञानमय वैदिक संस्कृतीने त्यामुळे निव्वळ एकांगी अशा आध्यात्मिक उन्नतीकडे लक्ष न देता वैज्ञानिक प्रगतीची आवश्यकता लक्षात घेऊन विज्ञानाचा सखोल अभ्यास केल्याचे पुरावे पुण्याच्या डॉ. प. वि. वर्तकांच्या या विषयीच्या संशोधनातून समोर येतात. वेदांमध्ये क्लोनिंगचा उल्लेख सापडतो. ऋभु नावाच्या तीन भावांनी एका घोडयापासून दुसरा घोडा बनवला तसेच गायीच्या त्वचेपासून दुसरी गाय बनवली असा स्पष्ट उल्लेख आहे. दुसऱ्या महिन्यात मानवी गर्भाचे हृदय चालू होते हे ऐतदेय व भागवत पुराणात असलेले ज्ञान विज्ञानाने १९७२ नंतर सिध्द केले. इ. स. पूर्व ५००० मध्ये पतंजलींनी पातंजलयोग दर्शनामध्ये समाधिमधून ध्रुव ताऱ्याच्या गतीचे ज्ञान प्राप्त होते असे म्हटले आहे. विज्ञानाने ध्रुव ताऱ्याला गती नाही असे मानून fixed star असं नाव दिलं होतं. विसाव्या शतकात ध्रुवाला गती असते हे सायन्सला समजले. प्राचीन भारतीय वेद, उपनिषद व पुराणांमध्ये कानांमुळे दिशा कळतात असं स्पष्टपणे म्हटलं आहे. १९३५ नंतर कानामधील लॅबिरिंथमुळे दिशाज्ञान होते हे सायन्सच्या लक्षात आलं. सुश्रूत संहितेत सांगितलेली कापलेलं नाक पुन्हा बनवण्याची पध्दत १९६८ नंतरच्या प्लॅस्टिक सर्जरीत सर्वमान्य झालेली आहे. याप्रमाणे प्राचीन भारतीय ग्रंथातून त्या काळातील वैज्ञानिक प्रगतीचे असंख्य पुरावे जागोजागी विखुरल्याचे डॉ. प. वि. वर्तकांनी शोधले आहेत. परंतु अध्यात्माविषयी जेव्हा बुध्दीनिष्ठ दृष्टीकोनातून विचार करण्याची वेळ येते त्यावेळी तथाकथित विज्ञानवादी यासंबंधी तटस्थपणे विचार करणे तर राहिले दूरच, अध्यात्म वगैरे सब झूठ आहे, थोतांड आहे अशा चुकीच्या अभिनिवेशामुळे काहीही ऐकून घेण्यास तयार नसतात. विज्ञान आपल्या मर्यादेत ज्ञानाचा सतत शोध घेत असते, त्यामुळे त्यांची ही वृत्तीच विज्ञानाच्या विरोधात जाणारी आहे असे म्हणता येईल. संकुचित मनोवृत्तीमुळे हे तथाकथित विज्ञानवादी स्वतःहूनच ज्ञानसंपादनाचे काही मार्ग कायमचे बंद करताना दिसतात. अध्यात्म म्हणजे नेमकं काय हेच जाणून न घेता, त्याचा अभ्यासही न करता केवळ विरोधासाठी विरोध करत असतात. जेथून मिळेल तेथून ज्ञान प्राप्त करून आत्मोन्नती साधणं हे मनुष्याचे कर्तव्य असायला पाहिजे, मग तो मार्ग विज्ञानाचा असो वा अध्यात्माचा, मार्ग महत्त्वाचा नाही तर ज्ञान आणि ध्येय महत्त्वाचे आहे. एकारलेल्या, चुकीच्या विज्ञानवादी अभिनिवेशामुळे हेच नेमकं त्यांना समजत नाही. याउलट अध्यात्माचा खरा अर्थ न समजलेले दांभिक अध्यात्मवादी सुध्दा विज्ञानाच्या प्रगतीमुळे मिळालेले सर्व फायदे उपभोगत असतानाच दुसरीकडे विज्ञानाची टिंगल करू बघतात. स्वतः भ्रमित झालेले, अज्ञानाच्या खोल चिखलात रुतलेले हे तथाकथित बुवा-महाराज सामान्य लोकांपुढे अध्यात्माच्या नावाखाली अंधश्रध्दांना खतपाणी घालत, भलत्यासलत्या आश्वासनांची खैरात करत स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ साधताना दिसतात. मोक्षाची दुकाने थाटून विकृत अध्यात्माचा धंदा मांडतात. हे स्वार्थांध भोंदू साधू समाजाला विकृत अध्यात्माचा डोस पाजून त्याच्या सारासार विचारशक्तीवरच घाव घालून पंगू बनवतात. समाजात विज्ञान म्हणजे विच्छेदक ज्ञान असा चुकीचा समज पसरवतात. अध्यात्माचे जेवढे नुकसान या विकृत अध्यात्मवादींमुळे होताना दिसते. तेवढे अध्यात्माला विरोध करणाऱ्यांकडूनही होत नाही. भारताच्या इतिहासावर एक नजर टाकल्यास अशा विकृत अध्यात्मवाद्यांकडून अहिंसेचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे घडून आलेल्या हिंसेमुळे जी मोठी किंमत देशाला चुकवावी लागली त्याचे चित्र सहज स्पष्ट होते. यावरून असे म्हणता येईल की आज खरी गरज आहे ती अभिनिवेशरहीत ज्ञानपिपासू संशोधक दृष्टीने प्राचीन भारताच्या या ज्ञानभांडाराकडे डोळस विज्ञाननिष्ठ भूमिकेतून बघून, प्राचीनांनी कष्टाने कमावलेल्या ज्ञानाचा आधुनिक भारताच्या सर्वांगीण उन्नतीसाठी उपयोग करण्याची, प्राचीनांनी आध्यात्म व विज्ञानामध्ये साधलेला सुसंवाद लख्ख ज्ञानप्रकाशात एकदा लक्षात आला की आपोआपच संकुचित, क्षुद्र, दुराग्रही भूमिका गळून पडून आध्यात्म व विज्ञान परस्परांच्या विरोधात नसून, फार पूर्वीपासूनच भारतात मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रगतीसाठी उपयोगात आणलेले दोन मार्ग आहेत हे लक्षात येण्यास वेळ लागणार नाही. 

Wednesday, 8 March 2017

लहानपणीच्या काही आठवणी

 लहानपणीच्या काही आठवणी

     प्रत्येक व्यक्तीला एखादी गोष्ट करण्याची आवड असते, छंद असतो. ती व्यक्ती ती आवडीची गोष्ट आनंदाने करत असते. त्यामध्ये पुस्तक वाचन घ्या, लिखाण, क्रीडांगणावरील खेळ, पोहणे, पत्ते, व्हिडीओ गेम्ज खेळणे, या सर्व गोष्टी करण्यात वेगळा आनंद मिळत असतो. अशीच माझाही आवडीची एक गोष्ट आहे. ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण आहे. ती म्हणजे 'भटकंती'.......
          माझी आवड वेगळ्या स्वरूपाची आहे. शाळेत असताना देखील मी वर्गामध्ये कमी, बाहेर जास्त असायचो. भटकायची सवय मला लहानपणापासून आहे. रविवार असो किंवा सुट्टीचा दिवस..... संपूर्ण वेळ नदीवर पोहण्यात, झाडावर चढण्यात, पेरू खाण्यात आणि गावभर फिरण्यात जायचा. त्यामुळे लहानपणचे ते दिवस आठवले तर, "लहानपण देगा देवा" हि अभंगाची ओळ आठवते. लहानपणीचे दिवस छान होते. अभ्यास न करता भरपूर मार्क्स मिळायचे. कारण सर सर्व ओळखीचे होते. शाळेतील सर्व उपक्रमांमध्ये मात्र सहभाग असायचा. त्यामध्ये भाषण म्हणू नका, कबड्डी, खो-खो, रुंनिंग सगळ्या गोष्टी गाजवल्या आणि गाजल्यासुद्धा... त्यामुळे सर्व शिक्षक बऱ्यापैकी ओळखायचे. सांगायचं तात्पर्य एवढंच 'अभ्यास न करता मार्क्स मिळायचे'. हे सर्व ओळखून वडील  "वासरात लंगडी गाय शहाणी" म्हणायचे.... वाईट वाटायचं पण करणार काय? मनाला सवय लागली होती 'भटकंती'ची......
                माझ्या मुख्य विषयाकडे वळतो. गावात फिरत असताना विविध गोष्टी आपल्याला दिसतात. भटकंती म्हटलं की, काहीही काम धाम नसताना फिरणे. कुणाचं आमंत्रण नाही, कुणी बोलवलं नाही, बाहेर काही काम नाही, तरीदेखील फिरणे हि माझ्या भटकंतीची व्याख्या..... घरातून बाहेर पडायला कुठल्याही प्रकारच प्लॅंनिंग नसत, सोबत बाईक नाही, मोबाईल नसतो. प्रसाद एकटाच असतो. या फिरण्यात वेगळाच आनंद मिळतो. पहिली गोष्ट गाडी व मोबाइल शिवाय मी राहू शकतो आणि फिरत असताना मूर्ती तितक्या प्रकृती बघायला मिळतात. काही माणसं सोबत कुत्रं घेऊन फिरत असतात, काहींच्या सोबत बायको असते. पण या दोन्ही गोष्टीला मी अपवाद आहे. निसर्गातील व समाजातील वेगवेगळे पैलू पहावयास मिळतात. फिरत असताना गणपती मंदिराजवळ गेलो. सप्त्याचे कीर्तन चालू होते. दोन मिनिटं त्याठिकाणी थांबलो. कीर्तनकार महाराजांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरच महत्वाच्या वाटल्या.... आयुष्यामध्ये काही मागायचे असेल तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य मागा. काही टाकून द्यायचं असेल तर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार टाका. ब्रम्हरसाचे महत्व सांगताना 'नाम' हे सर्वश्रेष्ठ असून, मनुष्य नामाने हा जीवनरूपी भवसागर तरु शकतो. या ज्या गोष्टी महाराजांनी सांगितल्या, त्या दुःखरूपी, अज्ञानरूपी जीवनामध्ये आशेचा किरण ठरू शकतात.  त्यामुळे हा दिवस अध्यात्माच्या कार्यात लागला. असाच आज बाहेर पडलो थेट गोल्फ क्लब मैदान. हे मैदान फिरण्यासाठी नाशिकमधील एकच नंबर. तब्बेत कमी करण्यासाठी काही लोक त्याठिकाणी येतात तर काही ग्रीन जिमच्या तिथे मेहनत करून अंग मोकळं करतात. महानगरपालिकेने 'ग्रीन जिम' सारखं व्यामाच  साहित्य बसवून अत्यंत चांगलं काम केलं. गोल्फ क्लब वरती फिरून झाल्यावर घरी जाण्यासाठी निघलो. मैदानापासून घर ५ किमी. आणि रात्रीचे ८ वाजले त्यामुळे रिक्षा पकडली व रायगड चौक सिडकोत उतरलो. पुन्हा टाळ, मृदुंगाचा आवाज आला. आज देखील विशेष ऐकायला मिळणार होत. महाराजांनी कीर्तनाला सुरुवातच केली होती. त्या कीर्तनाच वैशिष्ट्य म्हणजे एक ३ ते ४ वर्षाचं लहान मुलं आणि ६ ते ७ वर्षाची जनाबाई कीर्तनाच आकर्षण ठरत होते. महाराज काय सांगता हे कदाचित समजत नसावं पण मध्ये प्रमाण सुरु झालं की नाचायला सुरुवात. ते बघताना खूप छान वाटलं. कॅमेरा असता तर एक फोटो देखील बघायला मिळाला असता. ।