जागतिक तापमानवाढीचा परिणाम आणि उपाय......
जागतिक तापमानवाढीचा परिणाम केवळ निसर्ग आणि मानव जातीवरच होत नसून तो आता पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यावरसुद्धा होत आहे. अंतर्गत हालचालींमुळे भूगर्भातील हालचाली वाढतात. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचे दोन्ही ध्रुव थरथरत आहे, ह् आता वास्तव आहे. याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, ते भविष्यातच कळणार आहे.तब्बल १८९९ पासून वैज्ञानिक पृथ्वीच्या ध्रुवाच्या थरथरण्याचा अभ्यास करीत आहेत. आजपर्यंत हे थरथरणे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीचाच एक भाग असल्याचे वाटत होते.मात्र, नासाच्या ‘जेट प्रपोल्शन लेबॉरटरी’चे वैज्ञानिक सुरेंद्र अग्निहोत्री आणि एरिक एविन्स यांनी पृथ्वीच्या थरथरण्याचे कारण हे जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या ध्रुवीय बर्फ वितळण्यामुळे आणि त्यातून वजनाच्या अस्ताव्यस्त प्रमाणामुळे आहे, असे संशोधनाअंती सिद्ध केले आहे. उपग्रहाच्या माध्यमातून समुद्रातील पाण्याच्या हालचालींचा अभ्यास करण्यात आला.‘सायन्स अॅडव्हान्स’ या मासिकात काही दिवसांपूर्वीच त्यांनी हा निष्कर्ष प्रकाशित केला आहे. १८९९ पासून वैज्ञानिक पृथ्वीच्या अक्षाच्या थरथरण्याचा अभ्यास करीत आहेत. विसाव्या शतकात ते थोडेसे कॅनडाकडे झुकल्याचे आढळले, पण २००२ नंतर ते इंग्लंडकडे झुकल्याचे आढळले असून अक्षाची गती दरवर्षी ७ इंचाने पूर्वेकडे वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे धृवावरील बर्फ वितळले. विशेषत: २००३ पासून ग्रीनलंडवरील २७३ ट्रिलियन किलो, तर पश्चिम अंटाक्र्टिकावरील १२४ ट्रिलियन किलो बर्फ वितळले. मात्र, पूर्व अंटाक्र्टिकेवर ७४ ट्रिलियन किलो बर्फ दरवर्षी जास्त गोळा होत गेले, तसेच यामुळे सागरी प्रवाहात आणि पातळीतही बदल होत आहे. याच असमतोलामुळे पृथ्वीचे ध्रुव थरथरत आहेत.
अखेर सत्य उलगडले
सुमारे ५०-६० वर्षांपूर्वीच नासाने यावर अभ्यास सुरू केला होता. त्यावेळी जागतिक तापमानवाढ नव्हती, पण भूकंप आणि भूगर्भातील अंतर्गत हालचालींमुळे ध्रुव थरथरायचे. त्यावर त्यांनी अभ्यास केला होता. आता ते कारण नाही, पण तरीही ध्रुव का थरथरत आहेत, याचा उलगडा त्यांना होत नव्हता. त्यामुळे त्यांनी पुन्हा नव्याने अभ्यास सुरू केला आणि त्यानंतर हे सत्य त्यांच्या अभ्यासातून समोर आले.
प्रयत्न करा अन्यथा परिणाम भोगा -प्रा. चोपणे
जागतिक तापमानवाढीमुळे अवर्षण, अतिवर्षां, अल-निनो, ला-निनो, तापमानवाढ, अशा मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीत वाढ होत आहे. आता या नव्या आश्चर्यकारक संशोधनामुळे भविष्यात काय होणार आहे, हे आजच सांगता येत नाही, पण कदाचित याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जागतिक तापमानवाढ कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हायला पाहिजेत अन्यथा, आपल्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे खगोल व पर्यावरण अभ्यासक, तसेच ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

उपाय -:
जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातला एक उपाय म्हणजे झाडं वाढवणे. सध्याचे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निमिर्ती कमी करणे आवश्यक आहे. जंगलांखालची भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. दुसरे म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण होताच तो पकडून सागरात सोडायची सोय करायला हवी किंवा याचे दुसऱ्या एखाद्या अविघटनशील संयुगात रूपांतर करावे लागेल. सागरात मोठ्या प्रमाणावर लोहसंयुगे ओतली तर वानस प्लवकांची (प्लँस्टॉन वनस्पती) वाढ होऊन त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल असं काही शास्त्रज्ञ म्हणतात.
सध्याच्या युगात कोणताही देश उर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. अभ्यासातील पहाणीनुसार विकसित देशांचा उर्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.[१३] परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे. या देशांपुढील मोठा प्रश्ण आहे तो म्हणजे उर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरुन हरितवायूंचे प्रमाण कमी होईल. भारत , चीन या देशात दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लाक्षणीय रित्या वाढते आहे. वापर गुणिले लोकसंख्या यांचा विचार करता काही वर्षातच हे देश जगातील इतर देशांना हरितवायूंच्या उत्सर्जनात मागे टाकतील. जगातील इतर विकसनशील देशांच्या बाबतीत हेच लागू होते. म्हणून सध्या उर्जेचा वापर कमी करून व जागतिक तापमानवाढीवर मात करता येणे अवघड आहे. यावर मात करण्यासाठी तज्ञांचे असे मत आहे की अत्ता लगेच कार्बन डायॉक्साईड या मुख्य हरितवायूला वातावरणात सोडण्यापासून रोखणे. त्यामुळे शास्त्रज्ञ ज्वलनाच्या अश्या प्रक्रिया शोधत आहेत ज्यामुळे वातावरणात कार्बन डायॉक्साईड सोडला जाणार नाही व उर्जेचे उत्पादन खोळंबणार नाही. मध्यम स्वरुपातील उपायांमध्ये वाहनांसाठी व वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी नवीन प्रकरचे इंधन शोधून काढणे हे आहे. कायमस्वरुपी उपायांमध्ये तंत्रज्ञे विकसित करणे जेणेकरुन मानवाचे खनिज व निसर्गातील अमूल्य ठेव्यावर अवलंबून रहाणे कमी होईल असे उदेश्य आहे.

Global Warming is a Global Warning.
ReplyDelete
ReplyDeleteTo save the Earth we all gotta try, or else in the future we’re all gonna fry!!