Tuesday, 28 March 2017

पानी फाउंडेशनमध्ये सहभागी व्हा...

पानी फाउंडेशनमध्ये सहभागी व्हा...
पानी फाउंडेशनचा हा विश्वास आहे की अपुऱ्या पाण्याच्या संकटावरचा उपाय हा पाणलोट व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण व पावसाच्या पाण्याच्या नियोजन यांत दडलं आहे. या करिता लोकांना प्रेरित करणं, प्रशिक्षित करणं आणि सक्षम करणं हे आमचं ध्येय आहे.
‘महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणं’ हे आमचं सर्वात पहिलं उद्दीष्ट आहे. प्रत्येक विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक थोडक्यात समाजातील सर्व स्तरातील असंख्य लोक जेव्हा या चळवळीत उतरतील तेव्हाच हे शक्य होईल.
पाणलोट विकासाच्या कामात ‘श्रमदान’ करून त्याचप्रमाणे अजून कोणत्या पद्धतीने तुमचा सहभाग तुम्ही दाखवू इच्छित असाल तर कृपया आम्हाला सविस्तरपणे कळवा. सोबत तुमच्याबद्दल ‘आम्ही जाणणं आवश्यक आहे’ असं जे जे तुम्हाला वाटत असेल त्या संपूर्ण माहितीबद्द्लचा तपशील द्या.
सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ साठी निवडलेल्या ३० तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे:
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि धारुर
लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा आणि कळंब
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री आणि खुलताबाद
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव
पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि इंदापूर
सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि उत्तर सोलापूर
अकोला जिल्ह्यातील बार्शी-टाकळी, पातूर आणि अकोट
वाशिम जिल्ह्यातील कारंजा
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड
वर्धा जिल्ह्यातील आर्वी
अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि धारणी
वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ असा आहे.
वेबसाईट: www.paanifoundation.in


सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ – दिनदर्शिका
३१ जानेवारी २०१७ – ३० तालुक्यांमधील गावांनी अर्ज देण्याची अंतिम तारीख
फेब्रुवारी आणि मार्च, २०१७ – ग्रामपंचायतीने निवडलेल्या पाच गावकऱ्यांचे चार दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबीर
८ एप्रिल ते २२ मे २०१७ – सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ स्पर्धेचा कालावधी
२२ मे ते ३१ मे २०१७ – गावाच्या प्रगतीचा अहवालाचे सादरीकरण
१ जुन ते ३० जुन २०१७ – गावाच्या प्रगतीच्या अहवालाची वैधता तपासणी
१ जुलै ते १५ जुलै २०१७ – गावकऱ्यांकडून करण्यात आलेल्या कामांचे गुणात्मक विश्लेषण
१५ जुलै ते १० ऑगस्ट २०१७ – सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावांना तज्ञ परिक्षकांचे मंडळ भेटी देऊन निकाल तयार करण्याचा कालावधी


No comments:

Post a Comment